Jalgaon Rain Saam Tv
Video

Jalgaon Rain : पुराच्या पाण्यात ट्रॅक्टरसह चालक गेला वाहून; जळगावमधील थरारक घटना, VIDEO

Tractor Swept in flood water in Jalgaon : जळगावमध्ये मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झालीय. या पुराच्या पाण्यात ट्रॅक्टरसह चालक वाहून गेलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : राज्यभरात पु्न्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर जळगावमध्ये मागील आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालीय. यामुळे नागरिकांची मोठी दाणादाण उडाली आहे. यादरम्यानच पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावकरांना गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचं देखील समोर आलंय.

दापोरी गावाजवळील नाग झिरी येथील गिरणा नदी पात्रातील ही घटना असल्याचं सांगितलं जातंय. या मध्ये ट्रॅक्टरसह चालक देखील वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून जळगावमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. ट्रॅक्टर वाहून गेल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, मुसळधार पावसामध्ये पाण्याच्या प्रवाहात ट्रॅक्टर वाहून जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT