टीपी मुंडे Saam Tv
Video

Maharashtra Politics: 'धसांच्या ताटात हरणाचं मटण', मुंडेंचा आरोप

OBC Leader TP Munde: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. टीपी मुंडे यांनी धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

Omkar Sonawane

सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराडच असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. त्यांनंतर आता बीडमधून एकेक गुंड, भाई, आका, खोका असे बिळातून बाहेर येत आहे. शिरूर तालुक्यात दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या बाप लेकावर अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मारहाण करणारा व्यक्ती हा सतीश भोसले उर्फ खोक्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर खोक्याचे अनेक कांड समोर येऊ लागले आहे. खोक्या हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे धस यांनी देखील मान्य केले. आता आमदार सुरेश धस यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे.

हा आरोप ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी केला आहे. शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याने शिकार केलेल्या हरणांचे मटण सुरेश धस यांच्या ताटात जात असल्याचा धक्कादायक आरोप मुंडे यांनी केला आहे. पुढे मुंडे म्हणाले, असा प्रकार जर होत असेल तर खोक्यावर कसा गुन्हा दाखल होईल, असा सवालही मुंडे यांनी केला. तसेच या प्रकरणावर आपण वनमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील मंगळवारी भेट घेणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. तसेच हरीण तस्करीमध्ये सुरेश धस यांना देखील सहआरोपी करा ते पण आकांचे आका आहेत, असा आरोप त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

SCROLL FOR NEXT