Lohgad fort viral video saam tv
Video

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

tourists smoking at lohagad fort viral video : लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करणाऱ्या पर्यटकांना शिवप्रेमींनी चांगलाच दणका दिलाय. शिवप्रेमींनी जाब विचारल्यानंतर पर्यटकांनीही चूक मान्य केली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

दिलीप कांबळे, मावळ | साम टीव्ही

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा लोहगड किल्ला हा महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील या किल्ल्यावर दरवर्षी देशभरातून हजारो पर्यटक अभ्यासासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, काही पर्यटकांकडून हुल्लडबाजी आणि नियमांचे उल्लंघनही केले जाते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीतून आलेले काही पर्यटक गडावर धुम्रपान करत होते. त्यांना बघून शिवप्रेमी तरूण संतापला. त्याने थेट जाब विचारला. यावर संबंधित पर्यटकांनी त्यांची चूक मान्य केली आणि माफी मागितली. पर्यटनाचा आनंद घेताना ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य, स्वच्छता आणि शिस्त जपली गेली पाहिजे. शिवप्रेमी आणि पर्यटक यांच्यात वाद होणार नाहीत, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गडाच्या पायथ्याशी धूम्रपानाशी संबंधित वस्तूंच्या विक्रीवरही नियंत्रणाची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT