Three accused in Tiger Shroff firing case detained in Kota saam tv
Video

टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे तिन्ही आरोपी पहिल्यांदाच थेट कॅमेऱ्यासमोर, VIDEO

Tiger Shroff firing case latest update : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे तिन्ही आरोपी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले. राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावरून या आरोपींना ताब्यात घेतलं.

Nandkumar Joshi

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करून फरार झालेल्या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. कोटा रेल्वे स्थानकातून या तिघांना ताब्यात घेण्यात आलं. फूल सिंह, रुतिक कुमार आणि रेहान अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत. अँटी गँगस्टर टास्क फोर्स आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. हल्ल्यानंतर आरोपी मुंबईहून दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करत असताना पकडले गेले. आरोपींमध्ये एक महाराष्ट्रातील, तर दोघे हरियाणामधील आहेत. या तिघांना पकडून पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आणण्यात आलं.

मुंबईच्या जुहू परिसरात रविवारी संध्याकाळी उशिरा तिघांनी टायगरवर गोळीबार केला होता. टायगर कारमधून जात असताना, तिघांनी समोरून त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यातून तो बालंबाल बचावला. तो सुखरूप आहे. या घटनेनंतर हे तिघेही आरोपी फरार झाले होते. त्यांना कोटा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतलं आहे.

तत्पूर्वी, या हल्ल्यानंतर काही वेळातच लॉरेन्स बिश्नोई टोळीनं त्याची जबाबदारी घेतली. या टोळीशी संबंधित गुंड अनिल पंडित आणि हरमन संधु यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT