Tiger Shroff News AI Image
Video

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी ३ जणांना रेल्वे स्टेशनवर घेतलं ताब्यात, CCTV फुटेज आले समोर

Tiger Shroff Firing Case Update News : जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दुचाकी जप्त केली. सुरत एक्स्प्रेसमधून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती असून, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काल संध्याकाळी सातच्या सुमारास जुहू परिसरातील पुष्पा नरसी पार्कजवळ ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी गोळीबारासाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली आहे. गोळीबारानंतर तिन्ही हल्लेखोर एकाच दुचाकीवरून फरार झाले. त्यांनी मीठीबाई कॉलेजमार्गे एस. व्ही. रोडने अंधेरी रेल्वे स्थानक गाठले. त्यानंतर तिघेही वेगवेगळे झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सुरत एक्स्प्रेसमधून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, राजस्थानमधील कोटा येथे त्यांना ताब्यात घेतानाचे दृश्य कैद झाले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवत ही कारवाई केली. सध्या संशयितांची कसून चौकशी सुरू असून, या गोळीबारामागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT