CCTV footage of accused in Tiger Shroff shooting case saam tv
Video

टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींचं CCTV फुटेज समोर

Tiger Shroff Firing Case: अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गोळीबारानंतर अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी पार्क करून ट्रेनने पळ काढणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

अभिनेता टायगर श्रोफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात महत्वाची बातमी समोर आली आहे. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज सामोर आले आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी पार्क करून आरोपीनी ट्रेनने पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीनी पोलिसांना चकवा देण्यासाठी वेगळाच मार्ग निवडल्याचे दिसत आहे. अंधेरी स्थानकाजवळ दुचाकी सोडून त्यांनी रेल्वेने प्रवास केला. गर्दीत मिसळून मुंबईबाहेर जाण्याच्या तयारीत असलेले आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात आरोपी नेमके कुठे गेले, त्यांना पळून जाण्यासाठी कोणी मदत केली का आणि या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT