Torres Scam Saamtv
Video

Torres Scam : ४ कोटींची गुंतवणूक करणारा भाजीवाला; एवढे पैसे आले कुठून? पाहा Exclusive Video

Vegetable Vendor Invest 4 Corer : मुंबईतील दादर, नवी मुंबईतील तुर्भे आणि मिरारोड येथील टोरेस नामक कंपनीकडून हजारो नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक झाल्याच समोर आले आहे. यात एका भाजीवाल्याने ४ कोटींची गुंतवणूक केली आहे.

Saam Tv

मुंबईतील दादर, नवी मुंबईतील तुर्भे आणि मिरारोड येथील टोरेस नामक कंपनीकडून हजारो नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक झाल्याच समोर आले आहे. गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा मिळणार असल्याचं गुंतवणूकदारांना सांगून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी आपला गाशा गुंडाळला. आपली फसवणूक झाल्याचं कळताच गुंतवणूकदारांनी मुंबईतील दादर, नवी मुंबईतील तुर्भे आणि मीरा-भाईंदर कार्यालयाबाहेर गर्दी केले बघायला मिळाली.

दरम्यान, या गुंतवणूकदारांमध्ये एक भाजीवाला असून त्याने ४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. भाजी विक्रेते प्रदीपकुमार वैश्य यांनी टोरेस कंपनीत ४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनी दिलेल्या यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वैश्य यांचे दादरच्या टोरेस शोरूमसमोर भाजीपाल्याचं दुकान आहे. त्यांनी या कंपनीत ४ कोटींची गुंतवूक केली असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एका सामान्य भाजीवाल्याकडे एवढे एवढे पैसे कुठून आले? कशासाठी एवढी गुंतवणूक केली? हा प्रश्न सर्वांना पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ३ ट्रकचा भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

Sugar Free Sweet Recipes : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा 'हा' शुगर फ्री हलवा, मधुमेही रूग्णही आवडीने खातील

Vastu Shastra: पैशाची चणचण, जीवनात अडी-अडचण येतेय? अंथरुणातील 'ही' चूक बदलतेय तुमची ग्रह दशा

गुजरातमध्ये पैशांचा पाऊस, पोती भरून भरून उधळल्या गायकावर नोटा, VIDEO व्हायरल

महिलांच्या 'या' भागावर तीळ म्हणजे नवऱ्यासाठी भाग्यवान, नशिब बदलतं

SCROLL FOR NEXT