Pune Crime News Saam Tv News
Video

Video: पुण्यात पुष्पा स्टाईलनं चंदनाच्या झाडाची चोरी

महिला बंगल्याच्या आवारात आली. त्यावेळी सात ते आठ चोरटे आवारातील चंदनाचे झाड करवतीने कापत असल्याचे निदर्शनास आले.

Rachana Bhondave

पुण्यात चंदन चोरीच्या घटना नवीन नाहीत मात्र शहरातील गजबजलेल्या प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात शिरून चोरट्यांनी शस्त्राच्या धाकाने चंदनाचे झाड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलीय. तक्रारदार परळीकर कुटुंबीय प्रभात रस्ता परिसरातील भारती निवास कॉलनीत राहण्यास आहेत. शनिवारी मध्यरात्री चंदन चोरटे बंगल्यात शिरले. गाढ झोपेत असलेल्या महिला आणि तिच्या कुटुंबीयांना बंगल्यात अज्ञात व्यक्ती शिरल्याचे लक्षात आले. चोरट्यांचा आवाज त्यांनी ऐकला. महिला बंगल्याच्या आवारात आली. त्यावेळी सात ते आठ चोरटे आवारातील चंदनाचे झाड करवतीने कापत असल्याचे निदर्शनास आले. महिलेने आरडाओरडा केला असता चोरट्यांनी महिला आणि तिच्या कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले. ७० वर्ष जुने झाड कापल्याने दुःख तर होत आहे पण अशा चोऱ्या होत असतील तर कशाला झाडे ठेवायची असा प्रश्न या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

Kalyan : बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी; महाथेरो गौतम रत्न यांचा आरोप

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या

SCROLL FOR NEXT