VIDEO : मुलांच्या शिक्षणासाठी आईचं मोठं पाऊल, पैसे नसल्याने केली चोरी  SAAM TV
Video

VIDEO : मुलांच्या शिक्षणासाठी आईचं मोठं पाऊल, पैसे नसल्याने केली चोरी

Kalyan Mother Theft News : कल्याण येथील विठ्ठलवाडीत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने चोरीचा मार्ग पत्करला. पोलिसांकडून महिलेला अटक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कल्याणच्या विठ्ठलवाडीत एका आईने आपल्या चार मुलांच्या शिक्षणासाठी चक्क चोरीचा मार्ग पत्करला आहे, पतीने सोडून दिल्यानंतर 'राणी भोसले' या महिलेवर आपल्या चार मुलांची जबाबदारी आली, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने तिने चोरीचा मार्ग पत्करला.

बारावी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाने आपल्या आईकडे.. म्हणजेच राणी भोसले हिच्याकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे मागितले, मात्र पैशांची अडचण असल्याने काय करावे असा प्रश्न तिच्यासमोर उभा झाल्याने तिने चोरी करण्याचे ठरवले. धावत्या लोकलमध्ये राणीने एका महिलेची चेन हिसकावली. चेन चोरी झाल्यानंतर महिलेने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान या घटनेचा CCTV समोर आला आणि पोलिस तपासात तीने चोरी केल्याचे उघड झाले, त्यानंतर राणी भोसले हिने चोरलेल्या सर्व दागिन्यांसह पोलिसांनी तिला देखील ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT