Eknath Shinde addresses a massive rally in Ahmedpur, Latur, as over 25,000 workers join Shiv Sena in a historic political event. saam tv
Video

MLC Election : ठाण्यात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विश्वासू उमेदवाराला मैदानात उतरवले

Thane Vidhan Parishad Candidate : ठाणे विधान परिषदेसाठी शिंदेसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज दुपारी ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Namdeo Kumbhar

MLC Election, Ravindra Phatak : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिलेल्या ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर शिवसेनेने आपला उमेदवार निश्चित केला आहे. शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांना पक्षाकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे.

ठाणे विधान परिषदेच्या जागेसाठी महायुती किंवा शिवसेनेकडून हितेंद्र ठाकूर यांच्या नावाचा विचार होणार की रवींद्र फाटक यांना संधी मिळणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच आणि चर्चा सुरू होत्या. मात्र, आज या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

ठाण्यातील टेंभी नाका येथील पक्षकार्यालय असलेल्या 'आनंद आश्रम'मध्ये रवींद्र फाटक यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द करण्यात आला. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा अर्ज त्यांना देण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र फाटक दुपारी १२:०० वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल करणार आहेत. फाटक यांच्या उमेदवारीमुळे ठाण्यातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT