Ram Purnekar statement on Pradeep Purnekar murder case saam tv
Video

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Thane Pradeep Purnekar Case: राम पूर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत एक व्हिडीओ समोर आणला. राजेंद्र शिंदे यांनी निखिल यादवला बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचा दावा त्यांनी केला.

Namdeo Kumbhar

Ram Purnekar PC, Pradeep Purnekar Case : ठाण्यातील बहुचर्चित प्रकरणासंदर्भात राम प्रदीप पूर्णेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या तपासावर अत्यंत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. माझ्या वडिलांना जाऊन २२ दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. आम्ही सर्व पुरावे देऊनही पोलीस कोणतीच ठोस कारवाई करत नाहीत, असा घणाघाती आरोप राम पुर्णेकर यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मिनाक्षी शिंदेंचे पती राजेंद्र शिंदेनेच निखिल यादवला बंदूक चालवायला शिकवली असा आरोप करत त्याने व्हिडीओ समोर आणलाय. याप्रकरणी राजेंद्र शिंदेसह मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणीही त्याने केलीय. "राजेंद्र शिंदे यांच्या मुळशी येथील गावी ही मंडळी बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जायची. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे ज्यात राजेंद्र शिंदे हे निखिल यादवला बंदूक चालवायला शिकवत आहेत, तर दुसऱ्या फोटोत ते त्याला बंदूक देताना दिसत आहेत," असा दावा त्यांनी केला.

"हल्ला करताना ज्या व्यक्तीने हेल्मेट घातले होते, ती पाचवी व्यक्ती दुसरी कोणी नसून राजा (राजेंद्र) शिंदेच आहे. मी राजेंद्र शिंदे यांच्या फोटोला AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हेल्मेट लावून पाहिले, त्यावर तो अमित सिंग नसून राजा शिंदेच असल्याचे स्पष्ट होते," असा दावा पुर्णेकर यांनी केला. नीळकंठ परिसरातील राजेंद्र शिंदे यांच्या घराबाहेर एका प्रत्यक्षदर्शीने त्यांना (राजेंद्र शिंदे) हेल्मेट घालताना पाहिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारूबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

SCROLL FOR NEXT