sensitive information leak, honeytrap spy India Saam TV News
Video

Thane : देशासोबत विश्वासघात, ठाण्यातून २७ वर्षांच्या इंजिनिअरला अटक!

Thane engineer arrested : ठाण्यातील २७ वर्षीय इंजिनिअर रवि वर्मा याला पाकिस्तानला लष्करी गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक. हनी ट्रॅपच्या माध्यमातून माहिती मिळवण्यात आली होती. पोलिस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

sensitive information leak, honeytrap spy India : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली ठाणे पोलिसांनी २७ वर्षीय इंजिनीअर रवी वर्माला अटक केली आहे. रवी वर्मा लष्कराला संरक्षण साहित्य पुरवणाऱ्या कंपनीत कार्यरत होता. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने रवीला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून गोपनीय माहिती मिळवली. नोव्हेंबर २०२४ मध्ये रवीचा पाकिस्तानातील एका मुलीशी फेसबुकद्वारे संपर्क झाला. त्यानंतर नोव्हेंबर ते मार्च २०२५ या कालावधीत तो फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे गोपनीय माहिती पुरवत होता. ठाणे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत रवीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून माहिती पुरवल्याचे पुरावे मिळाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रवीच्या अटकेमुळे संरक्षण क्षेत्रातील माहितीच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ठाण्यातील २७ वर्षीय इंजिनिअर रवि वर्मा याला पाकिस्तानला लष्करी गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक. हनी ट्रॅपच्या माध्यमातून माहिती मिळवण्यात आली होती. पोलिस तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT