Ajit Pawar Saam Tv
Video

Maharashtra Politics: ठाण्यावरून भाजप-एकनाथ शिंदे आमनेसामने, महायुतीमध्ये नाराजी नाट्य?

Eknath shinde vs BJP : मंत्रिपदाचा पेच अद्याप सुटलेला नाही, त्याआधीच पालकमंत्रिपदावरून तेढ निर्माण झाल्याचे समोर आलेय. ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde News : एकीकडे गृहमंत्रिपदासाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच असताना आता पालकमंत्रिपदासाठी देखील रस्सीखेच असल्याचे समोर आले. शिवसेना गृहमंत्रिपदासाठी आग्रही असताना ठाण्याच्या पालकमंत्रिपदासाठी देखील एकनाथ शिंदे आग्रही आहेत. तर दुसरीकडे भाजपदेखील ठाणे जिल्हा पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहे. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपचे जास्त आमदार विजय झाल्याने ठाण्याचे पालकमंत्रिपद भाजपच्याच मंत्राकडे राहावे असा देखील भाजपचा आग्रह आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपदासाठी शिंदे आग्रही आहेत, असे सूत्रांनी सांगितलेय.

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी ७ वाजता रामटेक बंगल्यावर शिवसेनेचे मुंबईतील आजी-माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक यांची बैठक होणार आहे. या बैठकीला मुंबईतील शिवसेना पदाधिकारीही उपस्थीत रहाणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुक पुढील दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुक पूर्व तयारी आणि रणनिती संदर्भात ही बैठक होत असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT