Governor Rajendra Arlekar interrupts Thalapathy Vijay during the Tamil Nadu oath-taking ceremony. Saam TV marathi
Video

लोकभवनात हायव्होल्टेज ड्रामा! राज्यपालांनी भर शपथविधीत थलापती विजय यांना रोखलं; नेमकं कारण काय?

CM Thalapathy Vijay latest news : तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना थलपती विजय यांना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी मध्येच थांबवत नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Namdeo Kumbhar

Governor Stops Thalapathy Vijay Mid-Speech : तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात आज एक अनपेक्षित प्रकार घडला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना मध्येच थांबवून कडक सूचना दिल्या. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना थलपती विजय यांनी अधिकृत मजकुराबाहेर काही अतिरिक्त शब्द आणि भाषणासारखा भाग उच्चारण्यास सुरुवात केली. त्यावर राज्यपालांनी तत्काळ आक्षेप घेत त्यांना मध्येच थांबवलं. या प्रकारामुळे शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी काही काळ शांतता पसरली होती, मात्र राज्यपालांनी नियमांचे पालन करण्यावर दिलेला भर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

“केवळ लेखी स्वरूपात दिलेला घटनात्मक मजकूरच वाचावा, त्याबाहेर काहीही बोलू नये,” अशा स्पष्ट सूचना राज्यपालांकडून देण्यात आल्या. यानंतर राज्यपालांच्या निर्देशानुसार विजय यांनी शपथविधी प्रक्रिया पूर्ण केली. या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT