kalyan news  Saam tv
Video

kalayn : 'कल्याणच्या रस्त्यावरून श्रीकांत शिंदेंना फिरवा'; केडीएमसी महासभेत ठाकरे गट-शिंदे गट आमने-सामने, नेमकं काय घडलं?

kalyan News : केडीएमसी महासभेत ठाकरे गट-शिंदे गट आमने-सामने आल्याचे दिसून आलं. खासदार श्रीकांत शिंदेंवरून शाब्दिक चकमक झाली.

Vishal Gangurde

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत सोमवारी ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यामुळे महासभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पालिका महासभेत शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून हा वाद पेटला.

महासभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या समस्येवर प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना एकदा कल्याणच्या रस्त्यांवर फिरवा, सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील,असे विधान केले.

बोरगावकर यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांच्यासह इतर नगरसेवकांनी बोरगावकर यांना धारेवर धरत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी शिंदे गटाच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांनाही कल्याणमध्ये फिरवा, आमच्या नेत्यांमध्ये दम आहे, अशा शब्दांत प्रत्युत्तर देत जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही गटांतील सदस्य एकमेकांसमोर आल्याने महासभेत काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT