Thackeray Group Suffers Major Setback in Konkan Ahead of ZP Election saam tv
Video

ZP Election : कोकणात ठाकरेंना पहिला मोठा धक्का; शिंदेसेनेचा उमेदवार बिनविरोध

Thackeray Major setback in Konkan before ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदानाच्या आधीच ठाकरे सेनेला कोकणात मोठा धक्का बसला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार रुहिता तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. याबाबत अधिकृत घोषणा निकालाच्या दिवशी होईल.

Nandkumar Joshi

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग | साम टीव्ही

महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय रणकंदन माजलं होतं. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले होते. या आरोपांची धूळ खाली बसत नाही तोच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडीचं सत्र सुरू झालं आहे. यावेळी कोकणातून बिनविरोध निवडीला सुरुवात झाली आहे. कणकवली तालुक्यात भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं खातं उघडलं आहे.

कणकवली तालुक्यातील जाणवली जिल्हा परिषद गटातील शिंदेसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे यांच्या विरोधातील हेलन कांबळे या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारानं माघार घेतली. त्यामुळं जाणवली गटाच्या उमेदवार तांबे या बिनविरोध निवडून आल्या. रुहिता तांबे या ओटव गावच्या सरपंच असून खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांच्या पाठोपाठ ओटव गावच्या सरपंच रुहिता तांबे या दोन्ही जिल्हा परिषदेच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. या निवडीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे आतापर्यंत तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्याची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून मतमोजणीच्या दिवशी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT