Thackeray Family Saam TV
Video

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Worli Dome : ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त विजयी मेळाव्या निमित्ताने पूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळालं आहे. या एकत्रित उपस्थितीमुळे सभागृहातील वातावरण भारावून गेले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वरळी डोममध्ये पार पडलेल्या विजयी मेळाव्यात आज एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण घडला. तब्बल दोन दशकांनंतर केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच नव्हे, तर त्यांचं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळालं. या भव्य मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे, तसेच राज ठाकरे यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि कुटुंबीय उपस्थित होते. या एकत्रित उपस्थितीमुळे सभागृहातील वातावरण भारावून गेले होते.

राजकीय मतभेद विसरुन ठाकरे कुटुंब एका व्यासपीठावर उभं राहिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेकांनी हा क्षण 'ठाकरे घराण्याच्या एकतेचं आणि महाराष्ट्राच्या भावनांचं प्रतीक' असल्याचं म्हटलं आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र पाहिल्याने उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आर्थिक स्थिती चांगली राहील, पार्टनरसोबत मतभेद होतील; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाची चक्र फिरणार

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

SCROLL FOR NEXT