TET Exam Saam Tv
Video

TET पेपर फोडण्याचा प्रयत्न, 9 जणांच्या टोळीला अटक

TET पात्रता परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न उधळून लावत मुरगुड पोलिसांनी ९ जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. आरोपींमध्ये काही परीक्षार्थी शिक्षकांचा समावेश असून संपूर्ण घटनेचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू आहे.

Namdeo Kumbhar

TET Exam 2025 : राज्यभरामध्ये शिक्षक TET पात्रता परीक्षा सुरू आहे या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय...मुरगुड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पथकाने ९ जणांना ताब्यात घेतले. आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक ( TET )पात्रता परीक्षा सुरू आहे पण या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून मुरगुड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. सदरच्या टोळीची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता असून मुरगुड पोलीस या घटनेचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत.

आज राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी शिक्षक समाविष्ट झालेले आहेत अनेक केंद्रावरती ही परीक्षा अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचाही सहभाग असून हे सर्व आरोपी कागल तालुक्यातील सोनगे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या मध्ये सर्व आरोपी कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत. काल सायंकाळपासून रात्रभर पोलीस या घटनेचा तपास करत असून अजूनही संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

Maharashtra News Live Update: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

मंत्र्याच्या भावाला-पुतण्याला बेदम मारहाण; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Weight Loss Tips For Man: पुरूषांनी वजन कमी करण्यासाठी 7 टिप्स फॉलो करा, सुटलेलं पोट जाईल आत

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT