beed rain news  saam tv
Video

Beed Rain: बीडला पावसाचा तडाखा; दुरुस्त केलेला पूल एक तासातच गेला वाहून, कंत्राटदाराची पोलखोल|VIDEO

State Highway Collapses Again: आहिल्यानगर-आष्टी-जामखेड या राज्य महामार्गावरील कडया गावाजवळील शेरी येथे उभारलेला तात्पुरता मातीचा पूल काल पुन्हा वाहून गेला आहे.

Omkar Sonawane

बीड: आहिल्यानगर-आष्टी-जामखेड या राज्य महामार्गावरील कडया गावाजवळील शेरी येथे उभारलेला तात्पुरता मातीचा पूल काल पुन्हा वाहून गेला आहे. अवघ्या एका तासाच्या पावसात पूल वाहून गेल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, प्रवाशांना तब्बल 10 किमीचा वळसा घालावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे. कडया येथील पुलाचे कामही अद्याप अपूर्ण आहे. या दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात मातीचा पूल बांधण्यात आला होता.

मात्र काल पडलेल्या मुसळधार पावसाने तो अक्षरशः एक तासात वाहून नेला. हे दुसऱ्यांदा घडत असून, याआधीही काही दिवसांपूर्वी पूल वाहून गेला होता. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याऐवजी पुन्हा तात्पुरता बंदोबस्त करून वेळ मारून नेल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची वाहतूक ठप्प झाली आहे, विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर पक्का पूल बांधून देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या प्रयत्न विरोधात भीम आर्मीचा मोर्चा..

Mumbai To Ram Mandir Travel: जय श्री राम! मुंबईवरून राम मंदिर कसे पोहोचावे? जाणून घ्या सर्वौत्तम मार्ग

आईला पाहायला बाल्कनीत गेली, ७व्या मजल्यावरून खाली पडली, ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Vande Bharat Sleeper Train: नव्या 'वंदे भारत' स्लीपर ट्रेनची पहिली झलक, हे 10 इनसाइड फोटो पाहा

Pune Crime : इथे फक्त बॉस, बाकी सगळे..; गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT