Bhum Paranda SaamTv
Video

Tanaji Sawant - Thackarey Group : तानाजी सावंत - ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन

Bhoom - Paranda Constituenchy : भूम परांडा मतदारसंघात दोन्ही शिवसनेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गोंधळ उडाला. तानाजी सावंत यांच्या रॅली समोर ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

Saam Tv

भूम परांडा मतदारसंघात दोन्ही शिवसनेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले बघायला मिळाले. तानाजी सावंत आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे भूममध्ये रॅलीदरम्यान समोरासमोर आल्याने काही कल तणाव निर्माण झाला होता. यावेळी तानाजी सावंत यांची रॅली दिसताच ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि ज्ञानेश्वर पाटील यांचे बॅनर देखील यावेळी दाखवण्यात आले आहे.

भूम परांडा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी काल जोरदार घोषणाबाजी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भूमच्या मुख्य चौकात त्यांची रॅली येताच याठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार रणजित पाटील यांची सभा नुकतीच पार पडलेली असल्याने त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे तानाजी सावंत यांची रॅली दिसताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी तानाजी सावंत यांना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, रणजित पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो दाखवण्यात आले आहे. मात्र विशेष म्हणजे तानाजी सावंत यांनी प्रसंगावधान राखत अनर्थ टाळण्यासाठी आपली रॅली या ठिकाणी काही काळ थांबवलेली दिसली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते पुढे गेल्यावर त्यांनी आपली रॅली पुढे नेलेली बघायला मिळाली.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT