Shivsena Shinde Group SaamTv
Video

Shivsena News : सावंत, केसरकरांचा पत्ता कट? शिंदेंसोबतच्या बैठकीत काय झाली चर्चा | VIDEO

Tanaji Sawant And Deepak Kesarkar News : शिवसेना आमदार दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रिपद मिळवण्याची धडपड सुरू झाली आहे. यासंदर्भात काल मध्यरात्रीनंतर या दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Saam Tv

शिवसेना आमदार दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रिपद मिळवण्याची धडपड सुरू झाली आहे. काल पाच तास वर्षा बंगल्यावर थांबूनही एकनाथ शिंदे यांची भेट न झाल्याने दोन्ही माजी मंत्र्यांना नाराज होऊन परतावं लागलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळातून तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांचा पत्ता कट होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी महायुतीत राजकीय घडामोडी सुरू आहेत. यात शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार झाली आहे. मात्र या यादीत नेमकं कोणाची नावं आहेत ययाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यासाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी कालपासूनच लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. काल याच संदर्भात आमदार तानाजी सावंत आणि दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले असता साधारण पाच तास त्यांना थांबवं लागलं. तरीही त्यांची भेट झाली नाही. मात्र रात्री उशिरा दोन वाजता त्यांची भेट झाली. या भेटीत एकनाथ शिंदे यांच्याकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या दोन्ही माजी मंत्र्यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही, हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

SCROLL FOR NEXT