Talwar Baba arrest Nanded Biloli police station chaos  Saam TV Marathi
Video

भोंदू खरातनंतर आता तलवार बाबाला बेड्या, पोलिस स्टेशनमध्ये जोरदार राडा, पाहा व्हिडिओ

Talwar Baba arrest Nanded Biloli police station chaos : नांदेडमध्ये ‘तलवार बाबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Viral Crime Videos India : नांदेडच्या बिलोली तालुक्यातील बडूर येथील भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली. तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर करडे याला अटक करुन बिलोली पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर बाबाच्या समर्थकांनी ठाण्यात गोंधळ घातला. पोलिसाला धमक्या दिल्याच सांगण्यात आलं. तसेच भोंदू बाबावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कागदपत्रे त्याच्या दोन समर्थकांनी फाडून फेकले. या प्रकरणी पोलिसांनी बाबाच्या दोन समर्थकांना देखील अटक केली. हा भोंदूबाबा हाथात तलवार घेऊन लोकांची फसवणूक करत होता. असा आरोप आहे. आता त्याच्या समर्थकांने दादागिरी केल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिकमधील अशोक खरात या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता नवीन प्रकरणे समोर येत आहे. नवी मुंबई, पुण्यानंतर आता नांदेडमध्येही भोंदू बाबा उघड झालाय. या प्रकरणी नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहेच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Maharashtra Live News Update: जळगावातील ग्रामीण भागात एलपीजी संकट, गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT