Swargate bus depo saam tv
Video

Swargate Bus Stand:धक्कादायक! स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेनं पाहिले २२ हजार अश्लील व्हिडिओ

Datta Gade: काही महिन्यांपूर्वी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली होती. स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार केला होता. या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती सामोर आली आहे.

Omkar Sonawane

पुणे येथील स्वारगेट बस डेपोमध्ये काही महिन्यांपूर्वी बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अथक प्रयत्नाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. घटना घडल्यानंतर तो तीन दिवस फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल तेरा पथकांची नियुक्ती केली होती.

अखेर त्याच्याच गावातून शेतातून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. तो सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या तपासातून धक्कादायक माहीती समोर आली आहे. दत्ता गाडेनं गेल्या वर्षभरात तब्बल 22 हजार वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीची सायबर तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यात ही माहिती मिळाली आहे. दत्तात्रय गाडेनं स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर दोन वेळा बलात्कार केला होता. 25 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT