Sushma Andhare  saam tv
Video

Maharashtra Politics: दोन्ही भावांची युती झाली, तर तिसऱ्याची गरजच नाही- सुषमा अंधारे|VIDEO

Sushma Andhare: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबते होण्याची चित्र दिसत आहे,आज उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचक व्यक्तव्यानंतर ठाकरेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मोठे विधान केले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल.आता संकेत नाही थेट बातमी देऊ असे सूचक वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात यावर चांगलीच चर्चा जोर धरू लागली आहे. यावरच ठाकरेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे साम टीव्हीशी बोलताना म्हणाल्या, मी एक सामान्य शिवसैनिक आहे माझ्या नेत्यांपेक्षा माझी काय भूमिका असणार आहे. दोघांनी वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी देखील यावर सकारात्मक भूमिका स्पष्ट केली आहे.

अमित ठाकरे यांचे विधान देखील अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. कौटुंबिक कार्यक्रमांना दोघे भेटत असतात एकमेकांची विचारपूस करत असतात आणि दोघांकडे एकमेकांचे फोन नंबरही आहे त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील लोकांनी यावर प्रतिक्रिया देणे योग्य राहणार नाही. जर दोन्ही भावांनी युती केली तर त्यांना दुसऱ्या कोणाचा हात हातात घेण्याची गरज नाही अस सुषमा अंधारे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT