Sushil Karad addressing media, denying links to Mahadev Munde murder case and demanding CBI investigation.  Saam Tv
Video

Walmik Karad: सुशील कराडचा खुलासा, महादेव मुंडेना ओळखतही नव्हतो; चौकशी होऊनच जाऊ द्या|VIDEO

Sushil Karad Official Statement On Mahadev Munde: महादेव मुंडे हत्या प्रकरणावर सुशील कराड यांचा मोठा खुलासा. आम्हाला महादेव मुंडे ओळखीचेही नव्हते, असे म्हणत सर्व आरोप फेटाळले.

Omkar Sonawane

महादेव मुंडे हत्या प्रकरणात नाव येत असलेल्या वाल्मीक कराड यांच्या मुलाने सर्व आरोप फेटाळून लावले. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे हत्येचे प्रकरण समोर आले. यामध्ये देखील संतोष देशमुख हत्येचा मुख्यसूत्रधार वाल्मीक कराड असल्याचे मुंडे कुटुंबियांचा आरोप आहे. यावर कराडचा मुलगा म्हणाला, महादेव मुंडे यांना मी, माझे वडील आणि भाऊ ओळखतही नव्हतो, असा स्पष्ट दावा सुशील कराड यांनी केला. आम्ही लवकरच एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत आणि निवेदन सादर करणार आहोत. जे एसआयटी किंवा सीआयडी चौकशीची मागणी करत आहेत, त्यांना हात जोडून विनंती आहे, की आम्ही CBI चौकशीची मागणी करतो. एकदाच सगळं स्पष्ट होऊ द्या. त्यांच्याकडे काही पुरावे असतील, तर आमच्याकडेही आहेत.

आम्हीही पत्रकार परिषद घेणार आहोत आणि आमची भूमिका मांडणार आहोत. माझ्या आणि भावाच्या कोणत्याही 17 तास चौकश्या झालेल्या नाहीत. माझा भाऊ डिस्चार्ज अर्जासाठी कोर्टात गेला होता, तो फरार नाही. तो परदेशात पळून जायचा प्रयत्न करत असेल, तर त्याचे ठोस पुरावे सादर करावेत. माझ्या आणि वडिलांच्या नावावर पासपोर्टसुद्धा नाहीत. त्याला पळून जायचं असतं, तर तो आतापर्यंत निघून गेला असता. या संपूर्ण प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. जे काही असेल त्याला आम्ही सामोरे जाणार आहोत, असे सांगत सुशील कराडने सर्व आरोप फेटाळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reels Addiction: तुम्हालाही सतत रील्स पाहायची सवय आहे? सोडवण्यासाठी 'या' टिप्स वापरा

Politics : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! सहकाऱ्यांशी खटकलं, नेत्याची सटकली; बैठकीतून बाहेर येताच पदाचा राजीनामा

Khan Sir: खान सर पुन्हा चर्चेत! श्रावणी सोमवारी घेतला हा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: जालन्यात पोलिसांची धडक कारवाई, कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या 62 बुलेट बाईक जप्त

Mumbai Crime : चेंबूरमध्ये थरार! फक्त १,००० रुपयांसाठी ४४ वर्षीय बॅडमिंटन कोचवर जीवघेणा हल्ला, बिअर बाटली फोडली अन्...

SCROLL FOR NEXT