manoj Jarange on suresh dhas Saam tv
Video

Maharashtra Politics: गोड बोलून सुरेश धसांनी मराठ्यांची मुंडके उडवले,मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया

Manoj Jarange Criticism of Suresh Dhas: सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील दहशतीवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार हल्लाबोल करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंना भेटल्याचे समोर आल्याने मोठे वादळ निर्माण झाले. यावरच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत सुरेश धस यांच्यावर सडकून टीका केली आहे. आष्टीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्याचवेळेस या सगळ्याची सुरुवात झाली असावी अशी शंका जरांगे यांनी व्यक्त केली.

"निवडणुकीपूर्वी मी फक्त तुमचा होतो, आणि निवडणुकीपुरतंच मुंडे घराण्याला शत्रू मानलं. प्रत्यक्षात, आमच्यात असं काही नव्हतं; हे सगळं केवळ जनतेला भासवण्यात आलं. गोरगरीबांकडून मते मिळवण्यासाठी सुरेश धसांनी फक्त राजकारण केलं.अशी टीका जरांगेनी केली."

तसेच "पंकजा मुंडेंनी तुम्हाला निवडणुकीत पराभूत करण्याचा प्रयत्न केला, पण मराठ्यांनी तुम्हाला उचलून धरलं, तुम्हाला पराभूत होऊ दिलं नाही.मात्र, धनंजय मुंडेनी आपले पोर मारून टाकले तरी तुम्ही त्यांना भेटायला गेले." असे म्हणत जरांगेंनी धसांवर निशाणा साधला.

जर कोणी तुम्हाला जबरदस्तीने बदनाम केलं असतं, तर आम्ही तुमच्या बाजूने ठाम उभे राहिलो असतो. पण तुम्ही मुंडे परिवाराला जाऊन भेटलात, हे सगळ्यांनी पाहिलं. मराठ्यांची फसवणूक करून आणि गोड बोलून तुम्हीच मराठ्यांचे मुंडके उडवले, असा जोरदार आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धसांवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT