Suresh Dhas SaamTV
Video

Santosh Deshmukh Case : भीक मागतो, झोळी पसरतो; बीड प्रकरणात सुरेश धस यांची CM फडणवीसांना कळकळीची विनंती

Suresh Dhas News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. आज त्यांनी संतोष देशमुख प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

Saam Tv

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडचे पालकमंत्री झाले पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. आज जिल्हाधिकरी अविनाश पथक यांची सुरेश धस यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसमोर बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बीड प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी भाष्य केलं.

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबद्दल बोलताना सुरेश धस म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हेच आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पाहिजे. माझी आर्त किंकाळी, आर्जव आहे की देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री व्हावे. याबद्दल मी भीक मागतो, झोळी पसरून विनंती करतो, विशेष बाब म्हणून ते पालकमंत्री व्हावे, अशी मागणी धस यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ही मालमत्ता लाखात हजारात नाही. कोट्यवधीची आहे. मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं, तेवढं आम्हाला कळत नाही. पण मुख्यमंत्र्यांनी कराडची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून सर्व गोष्टी स्पष्ट होतात. मालमत्ता जप्ता करण्याची मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिली आहे. ती अजिबात थांबू नये, असंही सुरेश धस यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT