beed politics  Saam tv
Video

Maharashtra Politics : अजितदादांसमोर धनंजय मुंडे-सुरेश धसांमध्ये खडाजंगी; डीपीडीसी बैठकीत नेमकं काय घडलं? VIDEO

beed politics : अजितदादा पालकमंत्री असलेल्या बीडची डीपीडीसीची बैठक वादळी झाली...अजितदादांच्या पहिल्याच बैठकीत नेमका काय राडा झाला? दादांसमोर धनंजय मुंडेंना कोण भिडलं? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Bharat Mohalkar

सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर 73 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आणि बीडमध्ये आलेल्या पालकमंत्री अजितदादांच्या हाती भ्रष्टाचाराचा कच्चा-चिठ्ठा असलेला पेन-ड्राईव्हच दिला....त्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरणार हे स्पष्ट झालं होतं... आणि त्यानुसारच बैठकीत धनंजय मुंडेंनी धसांना शह देण्यासाठी बीडमधील दहशतीचा मुद्दा उपस्थित केला...मात्र धसांच्या मदतीला पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे धावून आले आणि दोघांनी मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच मुंडे विरूद्ध धस-सोनवणेंमध्ये अजितदादांसमोरच जोरदार बाचाबाची झाली.

हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही तर धसांनी 73 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी अजितदादांकडे केलीय....त्यावर 5 वर्षांचीच नव्हे तर गेल्या 15 वर्षांची चौकशी होऊ द्या असं आव्हानच मुंडेंनी धसांना दादांसमोर दिलं...

प्रत्येक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरुन सत्ताधारी आणि विरोधक नेहमी आमने-सामने येतात... मात्र अजितदादांना पहिल्याच बैठकीत बीडच्या वादग्रस्त राजकारणाची झलक पाहायला मिळाली... हत्या, दहशत, आणि घोटाळ्यांवरून गाजलेल्या बीडच्या नेत्यांना अजितदादा कसं हाताळणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Tourism : एक दिवसाची भन्नाट ट्रिप! फिरा कल्याणजवळची ५ बेस्ट मॉन्सून पिकनिक स्पॉट्स

किडनी स्टोन की युरीन इन्फेक्शन? दोघांमधील फरक कसा ओळखायचा?

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी प्यायल्याने काय होते? 5 फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल

देवेंद्र फडवणीस दिल्लीत जाण्याच्या चर्चेनंतर भाजपच्या बड्या नेत्याची बॅनरबाजी, देवा भाऊंच्या नेतृत्वात...;

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; वसतिगृहांचा शासन निर्णय अखेर रद्द!

SCROLL FOR NEXT