sharad pawar on Sunetra Pawar Deputy CM Saam tv marathi
Video

Sunetra Pawar Oath Ceremony : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहणार? शरद पवारांचं मोठं विधान

Sunetra Pawar deputy CM oath : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांची आज गटनेतापदी निवड होऊन सायंकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ होण्याची शक्यता आहे. यावर शरद पवार यांनी बारामतीत मोजक्यात प्रतिक्रिया दिली.

Namdeo Kumbhar

Sunetra Pawar likely to become Deputy Chief Minister today : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्टवादी काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांची आज गटनेतापदी निवड होण्याची शक्यता आहे. तर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे सांगण्यात येत आहे. सुनेत्रा पवार या या उपमुख्यमंत्री होणार, याबाबत पवार कुटुंबाला कोणतीही माहिती नाही. अजित पवार यांच्या अस्थी विसर्जनाच्या दिवशीच मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली. आज सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी निश्चित होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला जाणार का? यावर बोलताना शरद पवार यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिले.

शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, शपथविधीसोहळ्याबाबत काहीही माहिती नाही. मी तर इथे (बारामतीत) आहे, मग कसा जाणार?

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मी सकाळी वाचलं, असे शरद पवार म्हणाले. अजितदादा पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्यामधून पक्षाने निर्णय घेतला असेल. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीती दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT