Sunetra Pawar  saam tv
Video

सुनेत्रा पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sunetra Pawar latest news : राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Sunetra Pawar meeting with PM Modi latest news : राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान कार्यालयात (PMO) पार पडलेल्या या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आलेय.

उपमुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची ही पंतप्रधानांसोबतची महत्त्वाची भेट मानली जात आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, ही केवळ एक सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. पण या भेटीमागे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT