sunetra pawar security upgraded to z plus cover saam tv
Video

Sunetra Pawar Security : सुनेत्रा पवार यांची सुरक्षा वाढवली; कमांडो, बुलेटप्रुफ कारसह एस्कॉर्ट वाहनं

Sunetra Pawar Security Z plus cover : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात बुलेटप्रुफ गाडी आणि एस्कॉर्ट वाहने असतील, अशी माहिती मिळाली आहे.

या झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेसाठी २४ तास अंदाजे ५५ सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत. त्यात एनएसजी कमांडो असतील. त्यांच्या सुरक्षा ताफ्यात बुलेट प्रुफ गाडी, तसेच अनेक एस्कॉर्ट वाहने असतील. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदी मिळाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना उच्च दर्जाची झेड प्लस सुरक्षाव्यवस्था देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुनेत्रा पवार राज्यसभेत खासदार होत्या. त्यांना त्यावेळी एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर ३१ जानेवारीला त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात यावी, असे राज्यातील सुरक्षा यंत्रणांनी सूचविले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा महाघोटाळा! थेट पोलिसांच्याच पगारावर मारला दरोडा; मुख्य सूत्रधार अखेर अटकेत

Maharashtra News Live Update: प्लास्टिकच्या कारखान्यात भीषण आग, आगीत काही कामगार अडकल्याची भीती

Gold Price Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT