Beed Crime Case SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : आधी फरार होण्यास केली मदत, नंतर अटक झाल्यावर वायभासेनेच खोलले आरोपींचे पत्ते | VIDEO

Sudarshn Ghule Arrested : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला आज पोलिसांनी अटक केली आहे. त्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या डॉ. वायभसे यानेच घुलेचा ठावठिकाणा पोलिसांना सांगितला आहे.

Saam Tv

बीड सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. या आरोपीचा ठावठिकाणा डॉ. वायभसे याच्यामुळे समजला आहे. आरोपींना फरार करण्यात डॉ. संभाजी वायभसे हा मास्टरमाईंड असल्याचं पोलिसांच्या तपासतून समोर आलं आहे.

बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. वाल्मिक कराडच्या सरेंडरनंतर आता पोलिसांनी आज मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना फरार होण्यास मदत केल्याच्या माहितीवरून काल डॉ. संभाजी वायभसे याची वकील पत्नी आणि एकाला काल एसआयटीने नांदेडमधून ताब्यात घेतलं. त्यानंतर वायभसे याला पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. मुख्य आरोपीसोबत वायभसे याने संपर्क केला होता. तसंच त्याला पैसे देखील पुरवले होते. त्यामुळे आरोपींना पळवणारा मास्टर माईंड हा वायभसे असल्याचंच यावरून दिसून आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT