Supriya Sule Saamtv
Video

Supriya Sule : सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीच्या अटकेवर सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल, पाहा Video

Santosh Deshmukh Death Case Update : बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. याबद्दल आता सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Saam Tv

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. यावरूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सवाल केला आहे. सरपंच हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींच्या अटका पुण्यातूनच कशा होतात? असा थेट सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीआयडी आणि स्पेशल एसआयटी टीमकडून तपास सुरू आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराड याने पुण्यात सरेंडर केल्यानंतर आता उर्वरित मुख्य २ आरोपींना देखील पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आता खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट सरकारला सवाल विचारला आहे. उशिरा का होईना आरोपींना अटक झाली आहे. मात्र सरपंच हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यतूनच अटक कशी होते? असा प्रश्न सुळे यांनी विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, अचानक नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : धुळ्यात अवकाळी पाऊस, झाड अंगावर पडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू

प्राध्यापकासोबत नाव जोडले, मित्र-मैत्रिणींकडून अपमान सहन झाला नाही; आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

Chana Koliwada Recipe: स्टार्टर रेसिपी, कुरकुरीत चना कोळीवाडा घरी कसा बनवायचा?

Crime: पुजाऱ्याकडून ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT