Kabutarkhana Saam Tv
Video

Mumbai: खबरदार! कबुतरांना दाणे टाकाल तर भरावा लागेल ५०० रुपयांचा दंड, मुंबई महानगर पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mumbai Kabutarkhana: मुंबईतील कबुतरखाने बीएमसीकडून बंद करण्यात आले तरी देखील जैन नागरिकांकडून कबुतरांना दाणे खायला टाकले जात आहे. या नागरिकांविरोधात पालिकेकडून कारवाई केली जात असून त्यांच्याकडून ५०० रुपये दंड आकारला जात आहे.

Priya More

मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर गेल्या दोन महिन्यांपासून कबुतरांना खायला दाणे टाकू नका असे बीएमसीकडून वारंवार सांगण्यात येत आहे. पण तरी देखील काही जैन नागरिक कबुतरांना दाणे टाकत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेने या व्यक्तींविरोधात कारवाई सुरू केली आहे. जे नागरिक कबुतरांना दाणे टाकतील त्यांच्याकडून ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. यासाठी पालिकेकडून कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान आतापर्यंत ८ हजारांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती महापालिका कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. दादरसह अनेक परिसरात कबुतरखाने बंद करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले होते. त्यानंतर पालिकेकडून हे कबुतरखाने ताडपत्री आणि बांबू लावून बंद करण्यात आले. असे असताना देखील जैन नागरिक त्या ठिकाणी येऊन कबुतरांना खाद्य टाकत आहेत. त्यांच्यावर कारवाई करत ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. 'कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांना आधी समजावले जाते. त्यांनी ऐकले नाही तर त्यांच्याकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तरी देखील त्या व्यक्तीने ऐकले नाही तर त्यांना थेट पोलिस ठाण्यात नेण्यात येत आहे.', असे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT