Monkey Saam Tv
Video

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

Monkey: राज्य सरकारने मानव-माकड संघर्ष टाळण्यासाठी एसओपी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये आता उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी ६०० रुपये दिले जाणार आहेत.

Ganesh Kavade

मानव व माकड-वानर संघर्ष टाळण्यासाठी एसओपी जाहीर करण्यात आल्या आहेत. वन विभागाकडून याबाबत एसओपी जाहीर केली आहे. उपद्रवी माकडांना जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडणार आहेत. माकडांसाठी प्रशिक्षित बचाव पथक तयार करणार आहे. मानवी वस्तीपासून १० किमी दूर वनपरिक्षेत्रात उपद्रवी माकडांना सोडणार आहे. माकडांना पकडण्यासाठी अनुभवी लोकांना मानधनही दिले जाणार आहे.

माकड पकडल्यानंतर किती मानधन मिळणार

- १० पर्यंत माकड/वानर बचावाकरिता सुरक्षितपणे पकडल्यास आणि सोडल्यास प्रती माकड ६०० रुपये दिले जातील.

- १० पेक्षा जास्त माकड/वानर संख्येसाठी प्रति माकड ३०० रुपये दिले जातील.

- एकावेळी एका प्रकरणात देण्यात येणारे आर्थिक सहाय्य १० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

- ५ पर्यंत माकड/वानर पकडणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तीस १ हजार रुपये प्रवास खर्च अनुज्ञेय करण्यात यावा.

- सदर संख्या ५ पेक्षा जास्त असल्यास वेगळ्याने प्रवास खर्च मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT