ST Bus Employee Strike  Saam tv
Video

ST Bus Employee Strike : एसटी संपात पडली फूट; संध्याकाळच्या सत्रात एसटी सेवा सुरळीत, पाहा व्हिडिओ

ST Bus Employee Strike News : पुण्यात एसटी संपात पडली फूट पडली आहे. आज संध्याकाळच्या सत्रात एसटी सेवा सुरळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची बस स्थानकावर गर्दी दिसून आली आहे.

Vishal Gangurde

पुणे : एसटी संपात फूट पडली आहे. स्वारगेट आगारातून एसटी बाहेर पडली आहे. पुण्यात संध्याकाळच्या सत्रात एसटी सेवा सुरळीत झाली आहे. कोकणात ठाणे मुंबई आणि इतर भागांमध्ये बसेस रवाना होत आहेत. एसटी बस आगारातून सुटल्याने बस स्थानकात प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रात प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता. मात्र, आता परिस्थिती सुरळीत होत आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावरच एसटी कामगारांनी संप पुकारला होता. मात्र, आज औद्योगिक न्यायालयाने आजचा अघोषित संप बेकायदेशीर ठरवला आहे. तसेच या संपात सहभागी झालेल्या संघटना आणि कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होता तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर संपात फूट पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Beed News : बांधकाम करताना तोल गेला अन् आक्रीत घडलं, बीडमध्ये २५ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT