Maharashtra Political News  AI Image
Video

Political News : सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावरून राजकीय वाद, पत्रकार परिषदेत पुस्तक फाडले

Sonia Gandhi Book : सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातील सावरकरांवरील लिखाणावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिंदेसेनेने पुस्तक फाडून निषेध नोंदवला, तर शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल केला.

Alisha Khedekar

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी १६ नोव्हेंबर रोजी ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राचं प्रकाशन केलं. मात्र, या पुस्तकावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याचा आरोप शिंदेसेनेने केला आहे. या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांचं पुस्तक फाडलं. सोनिया गांधी यांनी पुस्तकात सावरकर हे सातत्याने ब्रिटिश सरकारकडे माफी मागत असल्याचा उल्लेख केल्याचं शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.

तसंच, उद्धव ठाकरे यांनी हे पुस्तक स्वीकारल्याचा दावा करत शीतल म्हात्रे यांनी त्यांना थेट सवाल केला आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील लिखाण तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. सावरकरांचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान आहे, असंही त्या म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत जोडे मारले होते. मग उद्धव ठाकरे आता काय करणार? तेही काँग्रेसचा निषेध करणार का? असा सवाल शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याने ट्वीट केलं नाही, यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फ्लॉवर बटाटा भाजी कशी बनवायची ? सोपी आहे रेसिपी

Shivsena: निषेधाच्या नादात बाळासाहेबांचा फोटो फाडला, शिंदेंच्या नेत्या शायना एनसींचा VIDEO चर्चेत; ठाकरेसेना आक्रमक

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उदयसिंह यांची निवड

Blue Body Marks : दुखापत झाली नाही तरी शरीरावर दिसतात निळे डाग? सावधान! असू शकतात 'या' गंभीर आजारांचे संकेत

Washing machine shoe cleaning: घाणेरडे-मळलेले शूज वॉशिंग मशीनमध्ये कसे धुवाल? ही आहे योग्य पद्धत

SCROLL FOR NEXT