Sambhajinagar News SaamTv
Video

Sambhajinagar News : घाटी रुग्णालयाबाहेर सोमनाथ यांच्या आईचा काळीज पिळवणारा आक्रोश | VIDEO

Somnath Suryawanshi News : परभणी येथे झालेल्या आंदोलनात पोलिसांनी अटक केलेल्या आंबेडकरी समर्थक कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Saam Tv

परभणी घटनेत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह परभणी येथेच घेऊन जाण्यात येणार आहे. सूर्यवंशी यांच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात मृतदेह परभणीला घेऊन जाणार असल्याचं म्हंटलं आहे. त्याप्रमाणे आता हा मृतदेह घेऊन नातेवाईक परभणीकडे रवाना झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाबाहेर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी सध्या केलेली आहे. यावेळी सूर्यवंशी यांच्या आईचा काळीज पिळवटणारा आक्रोश याठिकाणी बघायला मिळत आहे. आंबेडकरी अनुयायांकडून देखील यावेळी मोठ्या प्रमाणात प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. यात आंबेडकरी समर्थकांनी आंदोलन सुरू केल्यावर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं यावेळी पोलिसांनी काही आंबेडकरी समर्थक कार्यकर्त्यांना तब्यात घेतलं होतं. यावेळी पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता मृत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह परभणी येथेच घेऊन जाण्यात येणार असल्याचं सूर्यवंशी यांच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

SCROLL FOR NEXT