Solapur News  saam tv
Video

SSC Result: सोलापूरातील दोन पठ्ठे 35 टक्के काठावर पास; सर्व विषयात 35 गुण घेऊन झाले उत्तीर्ण, निकालाची राज्यभर चर्चा| VIDEO

Just 35% But a Huge Win: दोन विद्यार्थ्यांनी आपल्या खास कामगिरीने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे दोघांनी केवळ 35 टक्के गुण मिळवत काठावर पास होत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Omkar Sonawane

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

सोलापूर: संपूर्ण राज्यभरात आज दहावीचा निकाल लागला असून यंदा एकूण 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी मागील वर्षाच्या तुलनेत किंचित घटली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून अनेक विद्यार्थिनींनी 99 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले, तर काहींनी शंभर टक्के मिळवत उत्कृष्ठ यश संपादन केलं आहे.

मात्र, या सर्व गाजलेल्या टक्केवारींच्या चर्चेत सध्या सोलापूरच्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या खास कामगिरीने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलं आहे. हे विद्यार्थी म्हणजे शिवम सचिन वाघमारे आणि इम्रान अब्दुल्ला शेख. विशेष म्हणजे दोघांनी केवळ 35 टक्के गुण मिळवत काठावर पास होत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, आणि त्यांचं हे यश साजरं करत संपूर्ण परिसरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे.

शिवम वाघमारे हा श्री सिद्धेश्वर बालमंदिरचा विद्यार्थी असून इम्रान शेख श्री मल्लिकार्जुन हायस्कुलमध्ये शिकतो. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेत, अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी काठावर का होईना, पण यश मिळवलं आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम करत त्यांच्या मित्रपरिवाराने गुलाल उधळत आणि फटाके फोडत यशाचा आनंद साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early cancer symptoms: ८० टक्के कॅन्सर पेशंट या ७ लक्षणांकडे दुर्लक्ष करतात; शरीरातील हे बदल वेळीच ओळखा

Maharashtra Live News Update: माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन

Sunetra Pawar : मोठी बातमी! नरहरी झिरवळांवर सुनेत्रा पवारांची नाराजी, स्पष्ट शब्दातच म्हणाल्या...

PM Kisan Yojana: एक चूक अन् ₹२०००चा हप्ता थांबला, राज्यातील १.७० लाख शेतकर्‍यांना झटका; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

How To Get Rid Of Dark Lips Naturally: काळे ओठ गुलाबी कसे करायचे? फॉलो करा या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT