solapur bjp Meeting Saam TV
Video

BJPच्या चिंतन बैठकीत खासदारांसमोरच कार्यकर्त्यांचा गोंधळ! सोलापुरात काय घडलं?

भाजपच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांच्या एकच गोंधळ, खासदारांसमोरच कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्यानं चर्चांना उधाण

Siddhesh Sawant

सोलापूर : सोलापुरात भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. भाजपाचे खासदार आणि सोलापूर निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असेलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. मात्र जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक म्हणणे मांडण्याची यावेळी कार्यकर्त्यांना सूचना केली. लोकसभेच्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी सोलापुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभेतील पराभवानंतर पहिल्यांदाच पार पडत असलेल्या बैठकीत झालेला हा गोंधळ सोलापुरात चर्चेचा विषय ठरतोय. दरम्यान गोंधळ सुरू होताच माध्यम प्रतिनिधींना बाहेर थांबवण्यात आले. गोंधळानंतर बंद दाराआड बैठक सुरू करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT