Solapur News SaamTv
Video

Solapur News : सोलापूरात माथाडी कामगार आक्रमक; कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद, 'हे' मोठं कारण आलं समोर|VIDEO

Backlash On Amit Shah's Statement : सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत माथाडी कामागरांनी काम बंदची भूमिका घेतल्याने कांद्याचे लिलाव होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Saam Tv

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचे सोलापुरात पडसाद उमटताना दिसून आले आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्री 12 वाजता माथाडी कामगारांचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन केलं. कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगार बाजारात आलेला कांदा उतरवण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. अमित शाह हे जोवर माफी मागत नाही तोवर माल बाजारात उतरवला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या कांद्याच्या गाड्या तशाच उभ्या असल्याचं बघायला मिळत आहे. बाजार समितीमध्ये अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी माथाडी कामगारांकडून केली जाते आहे. अचानक सुरु झालेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सोलापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये दररोज शेकडो गाडी कांदा येतो. रात्री हा कांदा उतरवल्यानंतरचं सकाळी 10 वाजता या कांद्याचे लिलाव पार पडतात. मात्र माथाडी कामगार आंदोलनाच्या भूमिकेवर असून कांदा अद्याप उतरवलेला नाही. या सर्व घटनेनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी पुकारलेल्या बंदनंतर प्रशासन आणि कामगरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर देखील माथाडी कामागर आज दिवसभर काम करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने आज सोलापुरात कांद्याचे लिलाव होणार नाही. माथाडी कामगार काम करणार नसल्याने आज दिवसभरात कांद्याचे लिलाव होणार नाहीत. मात्र शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला कांदा संध्याकाळनंतर उतरवून घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे. या कांद्याचे लिलाव उद्या सकाळी नेहमीप्रमाणे पार पडतील, माथाडी कामगार आणि बाजार समिती प्रशासनमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT