Solapur Rains: saam TV News
Video

Solapur Rain : सोलापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, ओढे - नाले खळखळून वाहू लागले|VIDEO

Solapur Rain News Update : उत्तर सोलापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. रानमसले, नान्नज, वडाळा परिसरात सखल भागात पाणी साचले असून, खरीप पेरणीपूर्व तयारी सुरू झाली आहे.

Namdeo Kumbhar

Solapur Rains: उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. उत्तर तालुक्यातील रानमसले, दारफळ गावडी,वडाळा,नान्नज, बीबीदारफळ, कळमण,कौठळी, पडसाळी भागातील ओढे - नाले दुथडी भरून वाहत आहेत.

दरम्यान,बहुतांश शेतकऱ्यांची मशागतीची कामे अद्याप बाकी आहेत.कित्येक वर्षाच्या खंडानंतर यंदा प्रथमच मे महिन्याच्या मध्यापासूनच अवकाळी पावसाने जोर धरल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे.अवकाळी नंतर मागोमाग मान्सूनही दाखल होत असल्यामुळे यंदा पेरणीसाठी उसंत मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

उत्तर तालुक्यात बहुतांश भागात सोयाबीन,तूर, उडीद, मका,भुईमूग या पिकावर भर दिला जात आहे.अवकाळी पावसामुळे लवकर पेरणीच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत मात्र पाऊस शेतकऱ्यांना किती उसंत देतो यावर बरेच काही शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे मदार अवलंबून आहे.रानमसले- पडसाळी परिसरातील ओढे बंधारे तुडुंब भरले आहेत.ओढ्या लगतच्या विहिरीत पाणीसाठा वाढला आहे.दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी पेरणीसाठी बी - बियाणे खतांच्या जुळवाजुळवीसाठी लगबग वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

SCROLL FOR NEXT