Solapur Saam TV
Video

Solapur : सोलापुरात चड्डी गँगचा थरार, मध्यरात्री शहरात गस्त | पाहा VIDEO

Chaddi Gang : मध्यरात्री घरफोड्या, दुचाकी चोरी आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये चार चोरटे चेहऱ्यावर काळं कापड बांधून चड्डीवर फिरताना आढळून आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर शहरात चड्डी गँगचा सुळसुळाट पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घरफोड्या, दुचाकी चोरी आणि अन्य चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष बाब म्हणजे या टोळीतील चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, ते चेहऱ्यावर काळं कापड बांधून चड्डीवर फिरताना दिसले आहेत.

शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांत रात्रीच्या वेळेस घरांच्या भिंती ओलांडत, गाड्यांच्या डिक्कीत हात घालून, कुलूप तोडून चोरी करतानाचे प्रकार या व्हिडीओत आढळून आले आहेत. चड्डी गँगचं धाडस इतकं वाढलं आहे की, पोलिसांनी गस्त वाढवूनही ते निर्धास्तपणे चोऱ्या करत असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT