BANJARA SOCIAL REFORMER RAMDHAN MAHARAJ RATHOD DIES OF HEART ATTACK DURING BHAJAN PROGRAM saam tv
Video

भजन करताना चक्कर आली अन्..; थोर समाज प्रबोधनकार रामधन महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन| VIDEO व्हायरल

Social Reformer Ramdhan Maharaj Rathod Dies of Heart Attack : भजन कार्यक्रमादरम्यान रामधन महाराज राठोड यांचे निधन झाले. भजन करताना अचानक त्यांना चक्कर आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bharat Jadhav

  • भजन करताना रामधन महाराजांना आला हृदयविकाराचा झटका

  • बंजारा समाजाचे प्रबोधनकार रामधन महाराज यांचे निधन

  • परतूर तालुक्यातील कार्यक्रमात घडली हृदयद्रावक घटना

अक्षय शिंदे, साम प्रतिनिधी

बंजारा समाजाचे थोर प्रबोधनकार रामधन महाराज राठोड यांच्या निधनाने संपूर्ण समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सुरुमगाव तांडा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. रामधन महाराज हे सुरुमगाव तांडा येथे आयोजित एका कार्यक्रमात बंजारा भजन सादर करत होते. बंजारा समाजाचे प्रसिद्ध प्रबोधनकार रामधन महाराज राठोड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, परतूर तालुक्यातील सुरुमगाव तांडा येथे बंजारा समाजाचे प्रसिद्ध प्रबोधनकार रामधन महाराज राठोड यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला बंजारा बांधव हजर होते. समाजप्रबोधनाचे विचार मांडत असताना आणि भजनात तल्लीन असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली. रामधन महाराज यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. अनेक वर्षांपासून ते बंजारा समाजात समाजाचं भजनातून प्रबोधन करत होते. त्यांची भजनाच्या कार्यक्रमाला नेहमी गर्दी होत असायची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

आयुक्त तुकाराम मुंढेंची नागपूरनंतर धुळ्यातही मोठी कारवाई; २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

SCROLL FOR NEXT