Social Media Restrictions Saam Tv
Video

Social Media Ban: आता भारतातही सोशल मीडियावर बंदी, सोशल मीडिया वापरावर निर्बंध येणार

Social Media Restrictions: केंद्र सरकार सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणणार आहे. मोबाईल वापरण्यासाठी अल्पवयीनांना पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Snehil Shivaji

सोशल मीडियाच्या वापरात भारतात लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच आघाडीवर आहेत आणि म्हणूनच आता लहान मुलांना मोबाईलमधून मैदानात नेण्यासाठी केंद्र सरकार एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार नेमका कोणता निर्णय घेणार आहे, हे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून.

आता भारतातही सोशल मीडिया बंदी

इंस्टाग्राम, फेसबुक वापरण्यासाठी आई वडिलांची परवानगी आवश्यक

18 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाऊंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी अनिवार्य

ई-कॉमर्स, सोशल मिडीया आणि गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीत

आई-वडिलांनी खरंच परवानगी दिली का याची खात्री सोशल मिडीया कंपनीला करावी लागेल

नियमाचं उल्लंघन केल्यास संबंधित कंपनीवर 250 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

केंद्र सरकार हा मोठा निर्णय घेऊन भविष्यातील पिढीला एका मोठ्या महाजालातून सोडवते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हा निर्णय अल्पवयीनांसाठी किती महत्वाचा ठरतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. अल्पवयीन मुलांचा सोशल मीडियातला वावर हा जगभरातच डोकेदुखीचा मुद्दा ठरलाय. यालाच आळा घालण्य़ासाठी ऑस्ट्रेलियानं कडक कायदा केलाय. त्याच धरतीवर भारतही कायदा करण्याच्या तयारीत आहे. आपल्या देशात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक कायदे केले जातात. मात्र गरज आहे कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT