Siddharth Malohtra Saam TV
Video

Bollywood News : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी झाले आई-बाबा! लग्नाच्या अडिच वर्षानंतर कन्या रत्न प्रात्प | VIDEO

Sidharth Malhotra : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या घरी एका लहान परीचं आगमन झाले आहे. कियारानं एका मुलीला जन्म दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या आयुष्यात एक आनंदाची बातमी आली आहे. त्यांच्या घरी एका गोंडस लहान मुलीचं आगमन झालं आहे. कियारानं एका मुलीला जन्म दिला असून, दोघंही आता पालक झाले आहेत. लग्नानंतर सुमारे अडीच वर्षांनी हे गोड क्षण त्यांच्या आयुष्यात आले आहेत.

सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न फेब्रुवारी 2023 मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. त्यांच्या जोडीला बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि चाहत्यांची लाडकी जोडी म्हणून ओळखलं जाते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी पालक होणार असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली होती. आता त्यांच्या कुटुंबात या लहान परीच्या आगमनामुळे एक नवा आणि सुंदर अध्याय सुरू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Khobryache Modak Recipe : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Vidyanand Bapat: श्रद्धेचा अवमान नको! विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफीची मागणी

Maharashtra News Live Update: विष प्राशन करून शेतकरी महिलेचा मृत्यू

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT