Shrinivas Vanga missing saam tv
Video

Shrinivas Vanga missing : श्रीनिवास वनगा आहेत कुठे? १६ तासांपासून नॉट रिचेबल, VIDEO

Maharashtra Assembly Election : श्रीनिवास वनगा यांना विधानसभेची उमेदवारी अद्याप मिळू न शकल्याने नाराज आहेत. गेल्या १६ ते १७ तासांपासून ते बेपत्ता आहेत. त्यांचे मोबाइल फोन स्वीच्ड ऑफ येत आहेत.

Nandkumar Joshi

श्रीनिवास वनगा गेल्या १६ तासांपासून नॉट रिचेबल आहेत. काल संध्याकाळपासून ते घरी परतलेले नाहीत. त्यांचे दोन्ही फोन बंद येत आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट न मिळाल्याने ते नाराज आहेत. काल संध्याकाळी ते घराबाहेर पडले होते. पण अद्याप घरी परतलेले नाहीत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

याबाबत त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी साम टीव्हीला सांगितले की, 'ते खूप टेन्शनमध्ये दिसत होते. त्यांच्या मनात खूप वाईट विचार येत होते. त्यांनी या गोष्टी बोलूनही दाखवल्या होत्या. आता माझ्या जगण्याला काही अर्थ राहिला नाही, असे ते बोलत होते. त्याच नैराश्येतून निघून गेले.'

त्यांचे वाहन इथेच आहे. कुणालाही न सांगता ते निघून गेले. त्यांना आश्वासन मिळालं होतं. पालघरमधून तिकीट देणार असं आश्वासन त्यांना मिळालं होतं, असे ते बोलत होते. पण त्यांना कुठूनही तिकीट मिळालं नाही. त्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यांनी काही दिवस अन्नपाणीही सोडलं होतं. डिप्रेशनमध्ये गेले होते, असंही वनगांच्या पत्नी सुमन यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT