INDONESIAN CHILDREN CAUGHT SLIDING ON WORLD'S LARGEST PYTHON IN VIRAL FOOTAGE saam tv
Video

महाकाय अजगरावर मुलांची घसरगुंडी! थरारक VIDEO पाहाच

Indonesia giant python video : इंडोनेशियातून सोशल मीडियावर अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लहान मुले जगातील सर्वात मोठ्या अजगराच्या पाठीवर चक्क घसरगुंडीसारखे खेळताना दिसत आहेत.

Saam Tv

इंडोनेशियामधून एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही लहान मुले जगातील सर्वात मोठ्या अजगराच्या पाठीवर घसरगुंडीसारखे खेळत असल्याचे दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मुलं अजगरावर चढाओढ करताना आणि त्याच्या अंगावरून खाली घसरत असल्याचा थरारक प्रकार पाहायला मिळत आहे.

हा अत्यंत धोकादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. लहान मुलांच्या या बेजबाबदार आणि जीवघेण्या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अजगरासारखा हिंस्र आणि महाकाय साप कधीही हल्ला करू शकत असताना, मुलांचा हा खेळ त्यांच्या जिवावर बेतू शकला असता, असे युजर्सचे म्हणणे आहे. दरम्यान, या व्हायरल झालेल्या व्हिडिओची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ खरा आहे की एआय (AI) द्वारे तयार केला गेलाय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही या व्हिडिओने पालकांमध्ये मोठी भीती निर्माण केली असून, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून मिटकरींचा मुख्यमंत्र्यांना टोला; शिरसाटांनाही सुनावलं

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यांत पूर्णपणे बदलणार टीम इंडिया; नव्या कर्णधार-उपकर्णधारासह मैदानात उतरणार

Latest Designs Saree: महिलांसाठी कमळाच्या डिझाईन्सच्या साड्या, लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न्स

Raisins Health Benefits: मनुके आरोग्यासाठी फायदेशीर, पण 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत!

SCROLL FOR NEXT