Sarpanch Santosh Deshmukh killing Case update saam tv
Video

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खळबळजनक अपडेट | VIDEO

Sarpanch Santosh Deshmukh Case Shocking Update : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत धनंजय देशमुख यांनी खळबळजनक दावा केला आहे. मागील सहा महिन्यांत कृष्णा हा तीन वेळा गावी येऊन गेल्याचा दावा देशमुखांनी केला आहे.

Nandkumar Joshi

योगेश काशिद , साम टीव्ही प्रतिनिधी, बीड

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या निर्घृण हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा ३ वेळा गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.

धनंजय देशमुख काय म्हणाले?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. हाच आंधळे तीन वेळा गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. सहा महिन्यांत आम्हाला जी माहिती मिळाली, ती सीआयडीला कळवली आहे. तीन वेळा कृष्णा आंधळे हा आरोपी गावाकडे येऊन गेला. ही माहिती खरी होती. आरोपीकडे कुठलाही मोबाइल नाही. त्यामुळे तपास यंत्रणेला त्याला शोधण्यात अडचणी येऊ शकतात. आरोपीकडून आमच्या सर्व कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. हे आरोपी सैतानी वृत्तीचे लोक आहेत. लवकरात लवकर कृष्णा आंधळेच्या मुसक्या आवळून पोलीस प्रशासनाने त्याची धिंड काढावी. त्याला अटक करावी अशी आमची मागणी असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT