Mumbai News marathi
Video

Mumbai : तरुणाचे केस कापून अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Nalasopara latest news : नालासोपाऱ्यात एका तरुणाचे केस कापून अर्धनग्न अवस्थेत भर रस्त्यात धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Namdeo Kumbhar

नालासोपाऱ्यात कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मोरेगाव परिसरात एका टोळक्याने भर रस्त्यात एका तरुणाचे केस कापून त्याची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली. महिलेची छेड काढल्याच्या आरोपावरून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा सगळा थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे, काल दुपारी घडलेल्या या गंभीर घटनेबाबत स्थानिक पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

नालासोपाऱ्यात एका तरुणाचे केस कापून, एका टोळक्याने भर रस्त्यात अर्धनग्न अवस्थेत त्याची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने एका महिलेची छेड काढल्याने त्याची धिंड काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत तुळींज पोलिसांकडे चौकशी केली असता, आमच्याकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अर्धनग्न अवस्थेत तरुण भर रस्त्यातून चालत असताना, त्याच्या पाठीमागून मोटारसायकलवर एक टोळके जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. नालासोपारा पूर्व येथील मोरेगाव परिसरातील काल बुधवारी साडेचार वाजताची ही घटना असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT